breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

घाटकोपरमध्ये पराग शहांच्या गाडीची तोडफोड

महाईन्यूज | मुंबई :

 घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षामधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले असून आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहता यांना डावलून उमेदवारी दिलेल्या पराग शहा यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

फडणवीस मंत्रीमंडळात गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबादारी सांभाळलेले प्रकाश मेहता हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रकाश मेहता यांना भारतीय जनता पक्षाच्या चौथ्या यादीतही स्थान मिळू शकलेले नाही. या वेळी नवा चेहरा देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाने घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून विद्यमान नगरसेवक पराग शहा यांनी उमेदवारी दिली. यामुळेच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पराग शहा यांच्या गाडीवर हल्ला चढवत गाडीची तोडफोड केली. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पराग शहा यांना अडवून धरले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button