गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रायगड पोलिसांचे केले कौतुक म्हणाले…
![Home Minister Anil Deshmukh lauds Raigad police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/EsQhPspUYAEcvG7.jpg)
रायगड । प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रायगड पोलिसांचे तोंडभरुन कौतूक केले आहे. रायगड जिल्ह्यातील शाळा, हायस्कूल, आश्रमशाळा येथील विद्यार्थिनी आदिवासी वाडीवरील महिला, कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला वर्ग यांना महिला अत्याचार, गुड टच, बॅड टच, महिला सक्षमीकरण आदीबाबत पोलीस दीदी यांच्यामार्फत कायद्याची माहिती देण्यात आली.
या उपक्रमांची दखल थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. रायगड पोलिसांचे कौतूक करताना गृहमंत्री म्हणाले की, आपण महिला व मुलींच्या दृष्टीने राबविलेला हा उपक्रम त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहेत. या उपक्रमामुळे महिला व मुली आणखी जोमाने व हिंमतीने समाजात वावरू शकतील. आपणा सर्वांनी सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा पुढाकार आदर्शवत आहे.
आपण महिला व मुलींच्या दृष्टीने राबविलेला हा उपक्रम त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहेत. या उपक्रमामुळे महिला व मुली आणखी जोमाने व हिंमतीने समाजात वावरू शकतील. आपणा सर्वांनी सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा पुढाकार आदर्शवत आहे. https://t.co/sG1CPQQYzW
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 22, 2021