क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग; चार दुकाने जळून खाक
![Chemical company catches fire in Mankhurd, 14-15 vehicles of fire brigade arrive at the spot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Fire-flames-burning-acciden.jpg)
मुंबई – मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. या आगीत चार दुकाने जळून खाक झाल्याचे कळते आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आले असून सध्या याठिकाणी कुलिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. दरम्यान, आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट येथील 31, 32 अब्दुल रेहमान स्ट्रीट या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज सकाळी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटले जात असून आगीत चार दुकाने जळून खाक झाली आहेत. या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅकिंग मटेरिअल आणि प्लास्टिकचे सामान असल्याने आग झपाट्याने पसरली. त्यामुळे परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर येळेत नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली. तसेच या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सर्व नागरिकांनी सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आले.