breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

मुंबई – भारतात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचे वितरण करण्यात आले आहे. त्यानुसार कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झालाय. आज सकाळी ५.३० वाजता तब्बल १ लाख ३९ हजार ५०० कुप्या मुंबईत पोहोचल्या. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे. इथून तो मुंबईतील वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरणासाठी पाठविण्यात येईल.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,74,488 वर

पुण्याहून मुंबईला लसीचा पहिला साठा येत असताना त्यासोबत पोलिसांची 2 वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून होती. मुंबईत लस साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. या स्टोरेजमध्ये एक कोटी लस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात लसींचा साठा करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. आतापर्यंत १ लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी को-विन अ‍ॅपवर झालेली आहे.

दरम्यान, राज्यात पहिल्या टप्प्यात मुंबईत 3, कोल्हापुरात 1 आणि पुण्यात 2 लसीच्या व्हॅन पोहोचल्या आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच आज राज्यातील 26 ठिकाणी लसीच्या व्हॅन जाणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी 13 शहरांमध्ये लसीचा पहिला साठा 8 विमानांच्या सहाय्याने पोहोचवण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button