Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
केक कापण्यासाठी मागितली सुरी, वेटरने त्याच सुरीने महिलेवर केला हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/cake-cutting.jpg)
मुंबई – केक कापण्यासाठी महिलेने सुरी मागितल्यानंतर संतापलेल्या वेटरने महिलेवरच सुरीने हल्ला केला. मुंबईतील अंधेरी येथील हॉटेलमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली.
निशांत गौडा (२३) असे आरोपीचे नाव आहे. फरझाना मीरत (३०) ही एनआरआय महिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेली असताना ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरझाना मीरत रविवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आली. ती पोरबंदर येथे लग्नासाठी जाणार होती. रविवीर ती आईसोबत जेबी नगर येथील हॉटेलमध्ये गेली होती. मीरतच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तिने वेगवेगळया डीशसह केकचीही ऑर्डर दिली होती. त्यासाठी तिने सहा ते सातवेळा वेटरला बोलावले.
निशांत गौडा ऑर्डरप्रमाणे केक घेऊन आला पण त्याने सुरी आणली नाही. त्यामुळे तिने त्याल पुन्हा सुरी आणण्यासाठी पाठवले. फरझानाची सुरी आणायला सांगण्याची जी पद्धत होती त्यावर निशांत प्रचंड संतापला होता. तो काही बोलला नाही. गपचूप निघून गेला. सुरी घेऊन आल्यानंतर ती फरझानाच्या हातात देण्याऐवजी त्याने त्याच सुरीने तिच्यावर वार केला. यामध्ये फरझानाच्या गळयाला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ३२६ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरझाना मीरत आणि तिच्या आईची जबानी नोंदवून घेतली आहे.