Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
‘कुणाला कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन उठवता येणार नाही’
मुंबई | ‘राज्यात केलेला लॉकडाऊन हा कंटाळा घालवण्यासाठी केलेला नव्हता. त्यामुळं कंटाळा आला म्हणून तो उठवताही येणार नाही. घिसाडघाईने लॉकडाऊन उठवला आणि लोक मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?,’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘जे काही करायचं आहे, ते सावध पावलं टाकून करणं गरजेचं आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. ‘लॉकडाऊन कधी उठणार? हाच सध्या राज्यातील जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. लोक कंटाळले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय हे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली.