Breaking-newsमुंबई
कल्याण डोंबिवलीत 10 दिवसात 4500 दुचाकींवर कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/rto-mumbai_.jpg)
कल्याण : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून विविध योजना राबल्या जात आहे. 2 तारखेपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने लॉकडाऊन जाहीर केला हा लॉकडाऊन 12 तारखेपर्यंत ठेवण्यात आला होता. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा लॉकडाऊन 19 तारखेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
आज केडीएमसीच्या लॉकडाऊनला 10 दिवस पूर्ण झाले असून, या लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणारे, तोंडाला मास्क न लावणारे, डबल सीट फिरणारे, विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे. या 10 दिवसात तब्बल 4 हजार 500 दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. तर 450 दुचाकी आणि चारचाकी वाहन जप्त केली आहेत.