breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवलीत क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांवर होणार गुन्हे दाखलं

मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाऊन असताना देखील खरेदीसाठी नागरिक गर्दीही करत आहेत. कल्याण-डोंबिवलीतही आता कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढ असल्याच चित्र आहे. कल्याण-डोंबिवलीतील अनेक भाग हे याआधीच कंटेंटमेंट झोन म्हणून जाहिर करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण, क्वारंटाईनमध्ये असलेले लोकही निष्काळजीपणाने घराबाहेर फिरत आहेत. जर क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांना याची गंभीरता समजत नसेल तर, अशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कडक इशारा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दिला आहे.

याच महिन्याच्या दोन तारखेपासून लॉकडाऊन असताना रुग्णांची सख्या कमी होत नसल्यामुळे दहा दिवसाचा पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता महानगरपालिकेकडून ज्यांच्या घरात सुविधा आहेत, अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केले आहे. पण या सुविधेचा काही रुग्ण गैरफायदा घेत नजर चुकवून घराबाहेर फिरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असे रुग्ण सोसायटीच्या सदस्यांना न जुमानता बाहेर पडत असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button