कट्टर राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर
![No reaction is my reaction - BJP leader Pankaja Munde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Pankaja-And-dhanu.jpg)
बीड | कट्टर राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा 42 व्या पुण्यतिथी महोत्सव पार पडतोय. त्यानिमीत्ताने हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर दिसले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-1.jpg)
यापूर्वी दरवर्षी पंकजा मुंडे व्यासपीठावर असतात. तर, धनंजय मुंडे हे पहाटेची पूजा करुन जातात. मात्र, यावेळी नव्यानेच पालकमंत्री बनलेल्या धनंजय मुंडे यांचीही हजेरी गहीनाथ गडावरच्या या जाहीर कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. यापूर्वी परळीमधल्या एका कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकच आले होते. मात्र, आता निवडणुकांनंतर प्रथमच कट्टर राजकीय विरोधक असलेले मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.