breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ खडसेंच्या नाराजीची अखेर केंद्रीय नेतृत्वाकडून दखल

मुंबई | महाईन्यूज | गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीची अखेर केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतली आहे. त्यामुळे खडसे सोमवारी दुपारी आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. याठिकाणी ते महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजप महामंत्री बी एल संतोष यांची भेट घेणार असल्याचे समजते. याशिवाय, ते भाजपमधील अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वीच भाजपची उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागनिहाय बैठक पार पडली होती. यावेळी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपल्या मनातील खदखत व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपमधीलच काहीजणांनी रसद पुरवली, असा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, प्रदेशाध्यक्षांसोबतच्या बैठकीत खडसे यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button