breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

इमोशनल ब्लॅकमेलिंग, गर्लफ्रेंडने न्यूड फोटो पाठवल्यानंतर त्याने केले सोशल मिडिया वर अपलोड

मुंबई | महाईन्यूज

सोशल मीडियावर पूर्व प्रेयसीचे बनावट अकाऊंट बनवून त्यावर तिचे न्यूड फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी शुक्रवारी बिझनेसमॅनला अटक केली. २०१७ साली ही घटना घडली होती. आरोपी गुन्हा करुन दुबईला निघून गेलेला होता. दोन वर्षांनी मायदेशी परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे. पीडित तरुणीची २०१३ साली आरोपीबरोबर ओळख झाली होती. तो तिच्या भावाचा मित्र होता. ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. २०१५ साली आरोपीने पीडित तरुणीला तिचे न्यूड फोटो पाठवायला सांगितले. तरुणीवर दबाव आणण्यासाठी आरोपीने आत्महत्येची धमकी दिली. फोटो पाठवले नाहीस तर, स्वत:ला सिगारेटचे चटके देईन असे सांगून त्याने इमोशनल ब्लॅकमेलिंग केले होते.

अखेर दबावाला बळी पडून तरुणीने तिचे न्यूड फोटो पाठवले. भावाला त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजल्यानंतर त्याने बहिणीला आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड करण्याची धमकी दिली. आरोपी सतत दिली धमकी देत होता. अखेर २०१७ साली त्याने तिच्या नावाचे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट बनवले व तिचा न्यूड फोटो अपलोड केला. तरुणीला याबद्दल समजल्यानंतर तिने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. आरोपी विरोधात ३५४(सी), ६७अ या कलमातंर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी पोहोचले, त्यावेळी तो दुबईल पळून गेल्याचे समजले पन आरोपी दुबईवरुन परतल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला निवासस्थानाहून अटक केलेली आहे. कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button