breaking-newsमुंबई

‘आशा’स्वयंसेविकांनी विविध मागण्यांसाठी अमित ठाकरेंना निवेदन

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात ‘आशा’ स्वयंसेविकांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मात्र तुटपुंज्या मानधनासह इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ‘आशा’च्या शिष्टमंडळाने अमित ठाकरेंच्या समोर आपल्या समस्या मांडल्या. तसेच आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते” अशी भावनाही व्यक्त केली.

सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 72 हजार आशा स्वयंसेविका आणि सुमारे 3 हजार 500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या ‘आशां’नी कोरोना संकटकाळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना अत्यंत तुटपुंजे (1600 ते 2500 रुपये) मानधन दिले जाते.

आशा स्वयंसेविका गेल्या 5 वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. त्यामुळे या आशा स्वयंसेविकांनी आज अमित ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ‘आशा’च्या शिष्टमंडळाने आपल्या समस्या मांडल्या. तसेच मनसेच आता आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते” अशी भावना व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button