breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आदित्य ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक, अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजप नेते याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांऐवजी CBI कडे देण्याची मागणी करत असताना, तिकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बैठक झाली. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला अभिनेता अक्षयकुमारही उपस्थित होता.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. जवळपास तासभर ही बैठक चालली. अक्षय कुमारने पोलीस कर्मचाऱ्यांना घड्याळे भेट देण्यासाठी, आदित्य ठाकरे आणि पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत जवळपास 1 तास बैठक झाली. पण सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या गाजते आहे. भाजपचे नेते या प्रकरणाच्या CBI चौकशी मागणी करताना, या प्रकरणाचा महाविकास आघाडी सरकारमधील मुंबईत राहणाऱ्या एका युवा मंत्र्यांचा संबंध जोडत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर तपासकार्यात दबाव असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केलाय.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशी मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button