breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल ठप्प;विद्युत पुरवठ्यात बिघाड

मुंबई – मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात (पॉवर ग्रीड) बिघाड झाल्याने वीज गेल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली आहे. या संदर्भात ‘बेस्ट’ने ट्वीट केले आहे. दरम्यान, वीज पुरवठा करणारा ग्रीड बंद पडल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. याचा फटका केवळ कार्यालयांनाच बसला नसून मुंबई लोकलवरही मोठा परिणाम झाला आहे. मध्य, सेंट्रल आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक जागच्या जागी ठप्प झाली असल्याने मुंबईकडे येणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आज आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलमध्ये खोळंबून राहिले आहेत. लोकलमधील पंखेही बंद असल्याने त्यांना उकाड्यात प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button