अफवा पसरवणाऱ्या आणि भडकावू पोस्ट टाकणाऱ्यावर कडक कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देखमुख
!["Pressure from seniors not to open their mouths on Anil Deshmukh" - Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Anil-Deshmukh-2.jpg)
मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४०७ गुन्हे दाखल झाले असून २१४ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. यासोबतच गृहमंत्री अनिल देखमुख यांनी अफवा, भडकावू पोस्ट टाकणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०७ गुन्ह्यांची (ज्यापैकी २२ N.C आहेत) नोंद २१ मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७१ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok व्हिडिओ शेअर प्रकरणी १९ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१४ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .