breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सुप्रिया सुळे यांचे ड्रग्ज आरोपींसोबत फोटो कसे? शिंदे गटाचा गंभीर आरोप

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलंय. या प्रकरणात गणेश शर्मा, गोविंदा साबळे अशी एकूण आठ नावे सापडली आहेत. ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या दोन मंत्र्यावर थेट आरोप केले होते. तर आज शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केलाय.

सलमान फाळके याच्याकडे ५४ ग्राम एमडी ड्रग्ज सापडले. त्याच्यासोबत शानू पठान हा ही होता असे त्यांनी सांगितले जात आहे. सलमान फाळके यांचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत फोटो आहे. हे फोटो बोलके आहेत.

हेही वाचा – राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह कसं आणि कोण देतं? काय आहेत नियम 

तुम्ही काचेच्या घरात राहता आणि दुसऱ्याचा घरावर दगड फेकता अशी टीका त्यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे या संसदरत्न आहेत. पण, त्याचे आरोपींसोबत फोटो कसे? जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांनी याचे उत्तर द्यावे, असं शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button