breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मालदीवला संबंध सुधारण्याची संधी, नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे मिळाले निमंत्रण

नवी दिल्ली : मालदीव आणि भारत या दोन देशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. चीनला खुश करण्यासाठी मालदीवने भारतासोबत पंगा घेतला. पण याचा मोठा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसला. त्यानंतर भारतीय पर्यटकांना मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांनी येण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथ विधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलेल्या परदेशी नेत्यांमध्ये मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांचा समावेश आहे. हा सोहळा 9 जून रोजी होण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या शेख हसीना आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हेही या समारंभाला उपस्थित राहणाऱ्या परदेशी नेत्यांपैकी एक आहेत. याशिवाय नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

मोहम्मद मुइज्जू यांनी देखील मोदींचे अभिनंदन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना निमंत्रण आले. इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, ब्रिटन, युरोपियन युनियन, नेदरलँड्स, इराण, इजिप्त, युक्रेन, मलेशिया आणि तसेच शेजारील राष्ट्र बांगलादेश, नेपाळ, मालदीव आणि श्रीलंका यांसह अनेक देशांमधून अभिनंदनाचे संदेश आले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या संदेशात मोदींसोबत जवळून काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

मुइज्जू म्हणाले की, “2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदी, भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे अभिनंदन.”

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले आहेत. त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्याच्या माघारीसाठी 10 मे ही अंतिम मुदत दिली होती. मुइज्जू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सत्तेत आल्यावर आपल्या देशातून सर्व भारतीय लष्करी जवानांना परत पाठवण्याचे आश्वासन दिले होते. 10 मेच्या अंतिम मुदतीपर्यंत, 88 पैकी शेवटच्या भारतीय लष्करी जवानांनाही परत पाठवण्यात आले आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शेख हसिना यांनी बुधवारी मोदींशी फोनवर चर्चा केली. यावेळी मोदींनी हसीना यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि मॉरिशसचे प्रमुख नेतेही मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button