breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मकर संक्रांत उत्साहात

हळदी-कुंकूच्या सोहळ्याने शिक्षकांनी जपला संस्कृतीचा वारसा

पिंपरी | कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात सर्व महिला शिक्षिकांनी एकत्र येऊन मकर संक्रांत उत्साहात साजरी केली. महाविद्यालयाच्या अतिशय उत्साही उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला शिक्षिकांनी संस्कृतीचा वारसा जपत हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रमाचा आनंद व्दिगुणित केला.

विद्यार्थ्यांना ज्ञानार्जना बरोबर संस्कृतीचा वारसा जपण्याची प्रेरणा मिळावी , विविध सणांची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महिला शिक्षकांबरोबर अनेक महिला पालकांनी देखील सहभाग नोंदविला.

हेही वाचा    –    ‘राज्य शासनाने डान्स खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज’; मेहबूब शेख

प्रा. सुनीता गायकवाड आणि सहकारी शिक्षिका यांच्या सुबक रांगोळीने कार्यक्रमाला शोभा आली. उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वैशाली देशपांडे, प्रा.स्नेहल साळवी, प्रा. विजया चौधरी, डॉ.सुनिता पटनाईक यांनी केले. शिक्षक पालक संघाच्या महिला पालक प्रतिनिधींचा उत्साह वाखारण्याजोगा होता.

या कार्यक्रमास उपप्रचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, महिला शिक्षिका व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button