WPL 2023 : महिला क्रिकेट प्रीमियर लीगला उद्यापासून सुरूवात
![Women's Cricket Premier League starts from tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/WPL-2023--780x470.jpg)
दिल्ली, गुजरात, मुंबई, बंगलोर आणि यूपी संघांचा समावेश
WPL 2023 : महिला क्रिकेट प्रीमियर लीगला उद्यापासून ( ४ मार्च ) सुरूवात होत आहे. या लीगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारतात आयपीएलचे आयोजन केले जाते मात्र पहिल्यांदाच महिलांची आयपीएल खेळवली जाणार आहे.
महिला इंडियन प्रीमियर लीगचा शुभंकर वाधिणी आहे. त्याला शक्ती असे नाव देण्यात आले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहे.
महिला प्रीमियर लीग २०२३ चा पहिला सामना ४ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. २३ दिवसांत ५ संघ २२ सामने खेळणार आहेत. अंतिम सामना २६ मार्चला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स या संघांचा समावेश आहे.