breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगमनेरच्या मेंढवन शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

 

संगमनेर | प्रतिनिधी 
तालुक्याच्या मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर बिबट्याने झडप मारून तिच्या नरड्याचा घोट घेतल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली. या महिलेच्या मृत्यूनंतर परिसरात रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यास जाणाऱ्या शेतकर्‍यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

हिराबाई एकनाथ बढे (४५) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे राहत असलेल्या हिराबाई बढे या सोमवारी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला, त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या गळ्याला बिबट्याच्या दातांच्या खोलवर जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत तत्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघड झाले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button