breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
“संप मागे घ्या, अन्यथा…”; ST कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा आदेश
!["Withdraw the strike, otherwise ..."; Court order to ST employees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/ST-Bus_1500530567280.jpg)
राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा ही मागणी घेऊन राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून वेगवेळ्या पद्धतिने आंदोलन करत आहेत. सरकारने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी राज्य शासनात एसचीचं विलीनीकरण करा ही एकच मागणी घेऊन कर्मचाऱ्यांचं आंदोलन सूरू आहे. त्यावरून आता उच्च न्यायालयाने लवकरात लवकर कामावर हजर होण्याचे निर्दश एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर आपआपसात चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न लावून कामावर रूजू व्हावे अन्यथा ताब्यात घेण्यात येईल असा कडक इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यानंतर आता आंदोलकांची काय भूमीका असेल हे पाहावे लागणार आहे.