महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या कधी आणि किती रुपयांनी
Petrol Diesel Price | दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. अशातच आता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी जास्त होत आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत.
राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांनी होणार आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र यावेळी लिटरमागे किमान २ रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – ‘तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करु नका’; इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य चर्चेत
भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे तेलाची गरज भागवण्यासाठी भारत ८७ टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारत आता भारत कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे.