Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इस्लामपूर मतदार संघात महायुती म्हणूनच लढणार

सदाभाऊ खोत : भवानीनगर येथे रेठरे हरणाक्ष गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा

सांगली :  ईश्वरपुर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणुन सर्व मित्र पक्षाना एकत्रीत घेऊन लढविल्या जातील, राज्यात व केंद्रात महायुती सरकारची सत्ता आहे,आपल्या परिसराचा रडलेला विकास पुर्णत्वाकडे नेण्यासाठी येणार्‍या निवडणुकीत आपण मतदारांनी महायुती च्या उमेदवारांना आशिर्वाद द्यावा असे अहवान रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांना माजी मंत्री व आ. सदाभाऊ खोत यांनी केले.

भवानीनगर येथे रेठरे हरणाक्ष जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा माजी मंत्री व आ.सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी चे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी चे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील म्हणाले, महाराष्ट्रात व केंद्रात भाजपा, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी व शिवसेना पक्ष एकत्रीत काम करीत आहेत,केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातुन ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते पुर्णत्वाकडे गेली,पाणंद रस्ते बारा फुटाने करण्याचा निर्णय झाला,गावा गावात पाणी पुरवठा योजना पुर्णत्वाकडे गेल्या,वैद्यकीय सेवा ग्रामीण भागापर्यत पोहचल्या,लाडक्या बहीनींचे नाते राज्यातील देवेंद्रभाऊ,अजितदादा,एकनाथ शिंदेसाहेब यांनी अधिक घट्ट केले आहे,विविध योजना घराघरात पोहचविल्या गेल्या,आता भविष्यात आपल्याला ग्रामीण विकास व बेरोजगारी चा प्रश्न सोडवायचा आहे.यासाठी येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत महायुती चा उमेदवार निवडुन द्यायचा आहे,यासाठी महायुती च्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी कामाला लागावे.

हेही वाचा –  डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ आता “ज्ञान प्रसाद ग्लोबल यूनिव्हर्सिटी”!

यावेळी रेठरे हरणाक्ष येथील शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी उपसरपंच सयाजीराव मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष धैर्यशिल मोरे, भवानीनगर गावचे युवा नेते माजी सरपंच धनंजय उर्फ दादासाहेब रसाळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष निवास पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ. सुरेखाताई जगताप यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी संदीप सावंत, चंद्रकांत पाटील, यदुराज थोरात, माजी सरपंच पांडुरंग मोरे, रेठरेहरणाक्षचे माणिक जाधव, विशाल पाटील, अक्षय मोरे, दशरथ कदम, धनाजी मोरे, भवानीनगरचे आनंदराव कळसे, डॉ रमेश गोडसे, गणेश पवार, विशाल मोरे, बिचुदचे शिरीष रसाळ, नंदकुमार मोहिते, राहुल मोहिते, जयवंत पाटील, येडेमच्छिंद्रचे शरद पाटील, रावसाहेब पाटील, डॉ सचिन पाटील, सुभाष चव्हाण, गणेश हराळे, राहुल खराडे, किल्ले मच्छिंद्रगडचे शशिकांत साळुंखे, शिरटेचे दिलीप लाड, जयवंत देसाई, सुनील पाटील, नरसिंहपुरचे सुभाष जगताप, निलेश कांबळे, लवणमाचीचे रामदास सरोदे आदी गावातील प्रमुख कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button