शरद पवारांना नेमकं काय झालंय?; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
![What exactly happened to Sharad Pawar ?; Information provided by Supriya Sule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Supriya-Sule-2.jpg)
मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे.शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
वाचा :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया
31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील 2 आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. शरद पवार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. वैद्यकीय तपासणीनंतर सध्या कुठलीही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिल्याचं कळतंय.
दरम्यान, कालच शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीने दिलं आहे.