Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली जावळीचा विकास गतिमान करू’; सैारभ शिंदे

जावलीचे सभापती सौरभ शिंदे व उपसभापती गोरख महाडिक यांनी स्वीकारला पदभार

कुडाळ : जावळीचा भाजपाचा पहिला सभापती होण्याचा बहुमान मला लाभला आहे, माझे आजोबा माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे व माझे वडील कै. भैय्यासाहेब यांच्या राजकीय विचारांचा वारसा जोपासण्याची आणि जावळीच्या जनतेची सेवा करण्याची संधी मला नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली आहे त्या संधीचे मी निश्चित सोने करून दाखवीन, सर्वांना विचारात घेऊन नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली जावलीचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मतनुतन सभापती सैारभ शिंदे यांनी यावळी बोलताना व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कुडाळ गणातून जावली पंचायत समितीला निवडून आलेले प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी सभापती पदाचा तर खर्शी बारामुरे गणातून विजयी झालेले गोरख महाडिक यांनी उपसभापती पदाचा पदभार स्वीकारला जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी त्यांना सभापती पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले नूतन सभापती व उपसभापतींना भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमाही भेट देण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे व भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे, हेमंतराव शिंदे. श्रीहरी गोळे, मारुती चिकणे, सैा. अंकिता शिंदे, मालोजीराव शिंदे, समीर आतार, दत्तात्रय पवार, महेश देशमुख, पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –  इंटर झोनल मैदानी स्पर्धांमध्ये पीसीपी च्या दिनेश फड आणि रिद्धीश्री वानागुट्टे यांची उत्तुंग कामगिरी

यावेळी बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले जावली तालुक्याला मोठी राजकीय परंपरा आहे नूतन सभापती सौरभ शिंदे यांच्या घराण्याला राजकीय वारसा असून त्यांनी यापूर्वी जावली तालुक्याचे उपसभापती म्हणून काम केले आहे शासन आणि प्रशासनाचा सौरभ शिंदे यांना दांडगा अनुभव आहे त्याचा फायदा सभापतीपदाच्या कारकिर्दीत त्यांना होईल तसेच मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करावं व आपल्या घराण्याला लाभलेला राजकीय वारसा उज्वल करावा.नूतन सभापती सौरभ बाबा शिंदे पुढे बोलताना म्हणाले आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ना.शिवेंद्रसिंहराजे,जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून विविध कल्याणकारी शासकीय योजना, घरकुल आदींचा लाभ तालुक्यातील माझ्या जनतेला मिळवून देण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप परमणे यांनी सर्वांचे स्वागत केले तर उपसभापती गोरख महाडिक यांनी सर्वांचे आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button