#waragainstcorona: धक्कादायक…२४ तासांत महाराष्ट्र पोलीसमधील ९१ कर्मचाऱ्यानी पॉझिटिव्ह; आतापर्यंत २६ योद्धे धारातीर्थ!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/6-18.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
गेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस सेवेत काम करण्याऱ्या ९१ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढताना जीवाची बाजी लावून पोलीस कर्तव्य बजावत आहेत.
महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत २ हजार ४१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ हजार ४२१ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. तसेच, २६ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात आतापर्यंत १ लाख २० हजार १५० जणांवर गुन्हा नोंद केला आहे. तसेच, विलगीकरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७०६ जणांवर कारवाई केली आहे. तसेच, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ८३५ जणांवर कारवाई केली आहे. कोविड-19 बाबत १०० नंबरवर आलेल्या कॉलची संख्या ९८ हजार ४६१ इतकी आहे.
तसेच, बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी राज्यात आतापर्यंत १ हजार ३२३ गुन्हयांची नोंद झाली आहे. विविध प्रकरणांमध्ये आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या २३ हजार ५७५ इतकी आहे. आतापर्यंत पोलिसांनी राज्यात ७६ हजार ४४५ वाहने ताब्यात घेतली आहे. त्यावर आकारलेल्या दंडाची रक्कम ६ कोटी ८५ हजार ५०१ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, विविध कारवाई करताना राज्य पोलीस दलातील ८६ कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रमरणी ४५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/EZU2j0dUwAAKULl.png)