breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#Waragainstcorona: दिलासादायक… राज्यात 722 कोरोना रुग्ण ठणठणीत : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाबाबत सर्वस्तरातून नकारात्मक बातम्या येत असताना मुंबईहून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या 722 जणांपैकी सर्वाधिक 441 पुरुष आहे, तर 281 या महिला आहेत. त्यामध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल 21 ते 30 वयोगटातील 160 रुग्ण बरे झाले आहेत. तर 98 रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 91 ते 100 वयोगटातील एका तरुणानेही कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक 374 रुग्णसंख्या मुंबईची आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात 120 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत  आहे. 23 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात 722 रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे 26 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना मुक्त रुग्णांचा वयोगट आणि बरे झालेल्यांची संख्या :

शून्य ते 10 (19)

11 ते 20 (59)

21 ते 30 (160)

31 ते 40 (164)

41 ते 50 (154)

51 ते 60 (98)

61 ते 70 (45)

71 ते 80 (15)

81 ते 90 (7)

91 ते 100 (10)

राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 5 हजार 218 जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणत 31 ते 60 वयोगटातील 418 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button