breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

यूपीएससीची मोठी कारवाई! पुजा खेडकर यांची उमेदवारी रद्द

पुणे | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, यापुढील काळात यूपीएससीकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा    –      ‘राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना चुकीची कागदपत्रं सादर केली होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यात त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी क्रीमिलेअर प्रमाणपत्राचा फायदा घेऊन आयएएस पद पदरात पाडून घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, त्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्येही अनियमितता असल्याचा दावा न्यायालयातील सुनावणीदरम्यान करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button