Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

कोयना वीज प्रकल्पाच्या पोफळीतील दोन टप्पे अखेर बंद ; ६०० मेगावॉट वीजेचा भासणार तुटवडा

चिपळूण : कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम अखे्र सुरू झाले आहे. त्यामुळे गुरूवारपासून कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोनची वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. पुढील तीन महिने कोयना प्रकल्पाचे दोन टप्पे बंद राहणार आहेत. त्यामुळे महानिर्मितीच्या कोट्यातील ६०० मेगावॉट वीज निर्मिती कमी होणार आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती १९६२ मध्ये करण्यात आली. एकूण १९२० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्यात ७० मेगवॉट क्षमतेचे चार युनिट आहेत. त्यातून २८० मेगावॉट वीज निर्मिती होते. दुसऱ्या टप्यात ८० मेगावॉट क्षमतेचे चार युनिट आहेत. त्यातून ३२० मेगावॉट वीज निर्मिती होते. प्रत्येकी ४ पेल्टन टर्बाइन असलेल्या एकाच भूमिगत पॉवरहाऊसमध्ये ६०० मेगावॉट वीज निर्मिती होते.

कोयना धरणीच्या जलाशयातून पाणी हेड रेस टनेलद्वारे पोफळी येथील पॉवरहाऊसमध्ये येते येथे वीज निर्मिती झाल्यानंतर टेल रेस टनेलद्वारे कोळकेवाडी धरणात सोडले जाते. कोयना धरणातून पोफळी येथील वीज निर्मिती करणाऱ्या संचाला पाणी पुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. या गळतीमुळे सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. ही गळती काढण्यासाठी प्रकल्पाचे दोन टप्पे बंद ठेवावे लागणार आहे.

हेही वाचा –  ‘एपस्टीन फाईल्स प्रकरणात मोदींचं नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदे म्हणाले की, हा…

मागील सहा वर्षापासून हे काम रेगांळले होते. अखेर या कामाला सुरवात झाली आहे. पुणे येथील एका एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. गळती काढण्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाचे दोन टप्पे बंद ठेवावे लागणार आहेत. राज्यात वीजेची मागणी सुमारे २५ हजार १८ मेगावॉटपर्यंत आहे. महानिर्मिती कंपनीसह खासगी कंपन्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला वीज पुरवली जाते. कोयनेची ६०० मेगावॉट वीज निर्मिती बंद झाल्यानंतर सरकारला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा         

कोयना धरणातून पोफळी येथील वीज निर्मिती करणाऱ्या संचाला पाणी पुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. ती काढण्यासाठी प्रकल्पाचे २ टप्पे बंद ठेवावे लागणार आहेत. यादरम्यान होणाऱ्या गैरसोयीवर उपाय काढण्याची सूचना वरिष्ठ कार्यालयाला दिली आहे. गुरूवारपासून शटडाऊन घेतला आहे. यामुळे ६०० मेगावॉटची तुट भासणार आहे.

– संजय चौपडे, मुख्य अभियंता पोफळी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button