शिवभक्तांनो… त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्री निमित्त २४ तास खुलं राहणार
Trimbakeshwar Temple Nashik | शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्री निमित्त २४ तास खुलं राहणार आहे. भाविकांना त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांना त्र्यंबकेश्वराच दर्शन घेता येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता कोणतीही वाईट घटना टाळण्यासाठी मंदिराच्या गर्भ गृहातील दर्शन मात्र बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा – पिंपरी ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा!
दरम्यान दुसऱ्या दिवशी ९ मार्चला रात्री ९ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वराचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवले जाणार आहे. तसेच व्हीआयपी दर्शन पास देखील लवकरच ऑनलाईन स्वरूपात मिळणार आहे.