breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

वाहतूक व्यवस्था ठप्प, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; नेमकं काय आहे कारण?

पुणे : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

सोमवारी रात्री पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गर्दी कमी झाली होती. दरम्यान वाहनचालकांच्या संपामुळे इंधन मिळणार नाही, या भीतीमुळे आणि इंधनाची दरवाढ होणार आहे, अशी अफवा पसरली होती. त्यामुळे गर्दीत भर पडली आहे. मात्र, आता पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे सर्व पेट्रोल पंप सुरु राहतील, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

हेही वाचा  –  अग्निसुरक्षा बळकटीकरण!

काय आहे ‘हिट अँड रन’ नवीन कायदा?

केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याच शक्यता आहे.

यापूर्वी आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे.यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button