लॉकडाउनला अजून वेळ आहे की, तो पर्यायच नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?- भाजपा
![There is still time for lockdown, is that not an option for Chief Minister Uddhav Thackeray? - BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/uddhav-thakare.jpg)
मुंबई |
राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल(शुक्रवारी) रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन संदर्भात दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं विधान केलं.तसेच, अन्य देशांनी घेतलेल्या निर्णयाची व तेथील करोना परिस्थितीची देखील माहिती देत, राज्यातील परिस्थितीशी तुलना केली. या पार्श्वभूमीवर आता भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, “हतबल मुख्यमंत्री” असं संबोधत मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे विविध ट्विट देखील भाजपाकडून करण्यात आलेले आहेत. “लॉकडाउनला अजून वेळ आहे की, तो पर्यायच नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? लॉकडाउन करायचा की नाही, याबाबत तुम्ही दोन दिवसांत ठरवताय. या दोन दिवसांतच हातावर पोट असलेल्यांनी कसं जगायचं, हे सुद्धा ठरवा आणि त्यांना दिलासा द्या …!” असं भाजपाने म्हटलं आहे.
लॉकडाउनला अजून वेळ आहे की, तो पर्यायच नाही @officeofUT? लॉकडाउन करायचा की नाही, याबाबत तुम्ही दोन दिवसांत ठरवताय. या दोन दिवसांतच हातावर पोट असलेल्यांनी कसं जगायचं, हेसुद्धा ठरवा आणि त्यांना दिलासा द्या मुख्यमंत्रीसाहेब…! pic.twitter.com/eURZkAt2Ne
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 3, 2021
तसेच, “स्वतःच ठेवायचं झाकून आणि… अशी गत झालीये तुमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे. स्वतःच्या राज्यात इतका हाहाकार माजलेला असताना, तुम्ही दुसऱ्या देशांनी काय केलं, ते काय करताहेत याची माहिती जनतेला कशासाठी वाचून दाखवताय?” असा सवाल देखील भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेला आहे.
स्वतःच ठेवायचं झाकून आणि… अशी गत झालीये तुमची @OfficeofUT तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे. स्वतःच्या राज्यात इतका हाहाकार माजलेला असताना, तुम्ही दुसऱ्या देशांनी काय केलं, ते काय करताहेत याची माहिती जनतेला कशासाठी वाचून दाखवताय? pic.twitter.com/I25lW400oD
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 3, 2021
“आधी करोना युद्धात स्वेच्छेने सहभागी झालेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काय मिळालं? मग डॉक्टर कुठून आणायचे? हा प्रश्न तुम्हाला पडणारच ठाकरेसाहेब. पुन्हा लढण्यासाठी डॉक्टर-वैद्यकीय कर्मचारी स्वतःहून पुढे का येत नाहीत? असा प्रश्न तुम्हाला पडत नाहीये का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?” असे प्रश्न विचारत भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे.
वाचा- पश्चिम बंगालमध्ये अमित शाहांचा रोड-शो झालेल्या ठिकाणी ४१ क्रूड बॉम्ब आढळल्याने खळबळ