ऊस काढत असताना हार्वेस्टर मशीन खाली सापडला तरुण
![The young man was found under the harvester machine while extracting sugarcane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/The-young-man-was-found-under-the-harvester-machine-while-extracting-sugarcane.jpg)
परभणी | शेतामध्ये ऊस काढत असताना हार्वेस्टर मशीन खाली तरुण सापडला. या घटनेत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील नांदगाव येथे घडली आहे. याप्रकरणी उद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती आहे.
पूर्णा तालुक्यातील नांदगावमधील नवनाथ रोहिदास जवंजाळ यांच्या शेतामध्ये हार्वेस्टर मशीनच्या साह्याने ऊस काढण्याचे काम सुरू होते. शेतामध्ये शुक्रवारी रात्री हार्वेस्ट मशीनने ऊस काढत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवनाथ रोहिदास जवंजाळ (वय १८ वर्षे) हा अचानक मशीन खाली सापडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, घरातील तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे जवंजाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेतामध्ये उभा असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कारखान्यांनी ऊस घेऊन जावा, यासाठी शेतकरी धडपड करत आहे. यातूनच सदरील प्रकार घडला असल्याची चर्चा जिल्हाभरात होत आहे.