breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,04,327 वर

मुंबईत ३,२६०, पुण्यात 4,321 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होतेय. राज्यात सोमवारी दिवसभरात 24,645 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 19,463 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तसेच 58 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 25,04,327 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 53,457 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 22,34,330 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 2,15,241 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात ३,२६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच १,३२३ जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३,६५,९१४ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ११,५९२ इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत ३,२८,३१ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या २५,३७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात सोमवारी 4,321 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,73,799 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 33 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 9,602 इतका झाला आहे. दरम्यान, काल आढळलेल्या 4,321 नव्या रुग्णांमध्ये 2,342 पुणे शहरातील, 1,187 पिंपरी-चिंचवडमधील आणि 567 ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button