पिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मालकिणीला आणि तिच्या मुलांना गुंगीचे औषध देऊन नोकर नेपाळी दाम्पत्य चोरी करून पसार

पिंपरी l  प्रतिनिधी

घरात काम करणा-या नेपाळी नोकर दाम्पत्याने घरमालकिणीला आणि तिच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातून लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन घरकाम करणारे दाम्पत्य पळून गेले. ही घटना मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास गोल्डन आर्च सोसायटी, बावधन येथे घडली.

हितेश सुभाषचंद्र धिंग्रा (वय 46, रा. गोल्डन आर्च सोसायटी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर व त्याची पत्नी पूजा (दोघे रा. नेपाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण श्रुती रवी खोसला यांच्या घरात आरोपी किशोर आणि त्याची पत्नी पूजा दोघेजण घरकाम करत होते. मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास आरोपींनी श्रुती आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीकारक औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातील लोखंडी लॉकर फोडून तसेच लाकडी कपाटे उघडून दीड लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button