breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हवामान विभागातील तज्ज्ञांनी दिली मान्सूनची चांगली बातमी

मुंबई : शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली. यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. मागील वर्षी कमी झाल्यामुळे यंदा वेळेवर येणार मान्सून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे. दरवर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.

हेही वाचा    –      Pimpri-Chinchwad | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

नैऋत्य मोसमी वारे देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात दस्तक देणार आहे. यामुळे १ जून रोजी सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळला मान्सून येणार आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनची वाटचाल कशी राहिल, यावर १ जूनची तारीख निश्चित ठरवली जाणार आहे.

अवकाळी पाऊस १९ मे पर्यंत कायम राहणार आहे. १९ मे नंतर अवकाळी पावसाचे वातावरण कमी होणार आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा पाऊस 106% राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा मे महिन्याचा शेवटी सुधारित अंदाज व्यक्त करणार आहे.

बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. दरम्यान, आयएमडीने ताज्या अलर्टमध्ये म्हटले आहे की सध्या कर्नाटकमध्ये चक्रीवादळ सक्रीय आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (40-60 किमी प्रतितास) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button