breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

SSC and HSC Result 2024 | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माहिती देण्यात आली आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागणार आहे. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे.

तसेच शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर अजून केलेल्या नाहीत. फक्त निकाल कोणत्या आठवड्यात जाहिर होणार आहे हे सांगण्यात आलं आहे. दहावी आणि बारावीचा निकाल विद्यार्थी mahresult.nic.in आणि msbshse.co.in या साईटवर पाहू शकतात.

हेही वाचा    –      ‘सोमवारपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार’; आयुक्त शेखर सिंह

बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. उत्तर पत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं असून आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button