breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, टेम्पोची ट्रकला धडक, एकाचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कोंबड्यांची वाहतुक करणाऱ्या टेम्पोने एका ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे.

खालापूर येथील फुडमॉल जवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही दुर्घटना घडली. तीव्र उतारावर कोंबडी वाहतुक करणारा टेम्पो साखरेची वाहतुक करणाऱ्या ट्रक वर जाऊन धडकला. या धडकेमुळे दोन्ही वाहनांना आग लागली. ज्यात कोंबडी वाहतुक करणाऱ्या टेम्पो चालकाचा जागीच जळून मृत्यू झाला. तर मोहम्मद सलमान वय २४ हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा     –      बडोदा बीएनपी पारिबा लार्ज कॅप फंड संपत्ती निर्मितीची २० वर्षे यशस्वी वाटचाल!

टेम्पो चालकाचा डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच आयआरबी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, खोपोली अग्नीशमन दल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेची टीम घटना स्थळी दाखल झाली. त्यांनी जखमी आणि मृत व्यक्तींना बाहेर काढले. अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुर्ववत केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button