breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा करसंकलन विभाग ॲक्शन मोडवर; निव्वळ ऑनलाइन भरणा सव्वादोनशे कोटी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने सध्या करवसुलीबाबत ॲक्शन मोडचा पवित्रा स्वीकारला आहे. गतवर्षीची जप्ती कारवाई, करदात्यांना कर भरण्यासाठी आवाहन करण्याचे नावीन्यपूर्ण मार्ग, यातून करदात्यांची मानसिकता बदलविण्यात विभागाला यश आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून 82 दिवसांच्या विक्रमी वेळेत तब्बल 300 कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यात 40 टक्के मालमत्ताधारकांनी आजपर्यंत आपला संपूर्ण कर जमा केलेला आहे.

शहरामध्ये आजमितीस 6,02,203 विविध प्रकारच्या मालमत्ता आहेत. महापालिकेच्या माध्यमातून चालूवर्षी 100 टक्के बिलांचे वाटप झाल्याने करवसुलीमध्ये सकारात्मक परिणाम झालेला आहे. विभागाच्या माध्यमातून सध्या 30 जूनपर्यंत असणाऱ्या मालमत्ताकरामधील सवलतींबाबत विविध माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यामध्ये एसएमएस, टेलिकॉलिंग, आय.व्ही.आर.एस. कॉलिंग, रील्स स्पर्धा, होर्डिंग्ज, पॉम्प्लेट, रिक्षाद्वारे आवाहन आदी मार्फत शहरामध्ये जनजागृती सुरू आहे.

निव्वळ ऑनलाइन भरणा सव्वादोनशे कोटी..
महापालिकेने मालमत्ताकरामध्ये आगाऊ कर भरल्यास 5 टक्के व ऑनलाइन कराचा भरणा केल्यास 5 टक्क्यांची सवलत असल्याने करदात्यांनी मोठ्या प्रमाणात सवलतींचा लाभ घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून ऑनलाइन स्वरूपात तब्बल सव्वाशे कोटींचा भरणा झाला असून, पेपरलेस व डिजिटल इंडिया अभियानास या सवलतींच्या उपक्रमाद्वारे चालना मिळालेली आहे.

३०० कोटी; पाच वर्षांचा दृष्टिक्षेप..
मागील पाच वर्षांच्या तुलनेत चालू वर्षी विभागाने विक्रमी वेळेमध्ये तब्बल 300 कोटींचे करसंकलन केले आहे.
वर्ष आणि 300 कोटी जमा होण्यास लागलेला कालावधी

2019-20 – 138 दिवस
2020-21 – 274 दिवस
2021-22 – 217 दिवस
2022-23 – 137 दिवस
2023-24 – 82 दिवस
या पद्धतीने ‘आले ३०० कोटी’..
ऑनलाइन/BBPS – 218 कोटी
कॅश – 39 कोटी
चेक/ डीडी – 26 कोटी
इतर – RTGS/NEFT/IMPS /EDC – 20 कोटी

गतवर्षीची जप्ती कारवाई, प्रकल्प सिद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, यामुळे या वर्षी करसंकलनात पालिकेने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. ही आघाडी वर्षभर कायम राहील, अशी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. आता होऊ घातलेल्या मालमत्ता सर्वेक्षणातून पालिकेची करप्रणाली अत्यंत पारदर्शी, लोकाभिमुख आणि समन्यायी ठरेल, अशी अपेक्षा आहे. सर्वेक्षणाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

1 एप्रिल ते 30 जून हे सर्वाधिक कर भरण्याचे दिवस म्हणजे एक प्रकारे पॉवर प्ले असतो. पण यात विभागापेक्षा कर्तव्यदक्ष, जागरूक जबाबदार करदाते यांचा सिंहाचा वाटा आहे. पालिकेने राबवलेल्या जनजागृती उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याला या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे शतशः आभार. उर्वरित करदात्यांनी सुद्धा 30 जूनपर्यंत आपल्या कराचा भरणा करावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button