breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

साताऱ्यात २५ मेपासून १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन

सातारा – देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 25 मेपासून ते 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

साताऱ्यात 24 मे रोजी रात्री 12 वाजता लॉकडाऊन सुरू होणार आहे.लॉकडाऊन काळात भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहणार आहेत. तसेच लग्न आणि अंत्यविधीला जाणासाठी आता कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक असणार आहे. त्याचसोबत लसीकरण झाल्याचे प्रणाणपत्रही बंधनकारक असणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान, काय सुरु काय बंद?
– सकाळी 7 ते 9 वृत्तपत्र आणि दूध केवळ घरपोच
– भाजी मार्केट, फळ मार्केट, बेकरी दुकाने बंद
– आठवडी आणि दैनंदिन बाजारासह फेरीवाल्यांना बंदी
– उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद
– वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारू दुकाने बंद, शिवाय घरपोच सेवाही बंद
– मटन, चिकन, अंडी, मासे विक्री बंद
– सर्व किराना दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा बंद
– गॅरेज, स्पेअरपार्ट दुकाने बंद
– खाजगी आणि सहकारी अशा सर्व बँका बंद
– सर्व बांधकाम बंद
– अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांव्यतरिक्त कोणालाच आता पॅट्रोल, डिझेल मिळणार नाही
– बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर मारला जाणार शिक्का आणि प्रवासातून आलेल्याला 14 दिवस गृह विलगीकरणात ठेवणे बंधनकारक असेल

Sharing is caring!

Facebook
Pinterest
Twitter
Google+
Related Posts:
अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोनामुक्त
अभिनेत्री दिव्या भटनागरचे कोरोनाने निधन
इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
कोरोनाविरोधातील लढ्यात सचिनही मैदानात; ऑक्सिजनसाठी १ कोटी रुपयांची मदत
Tags: Corona,corona virus,covid,COVID19,lockdown,maharashtra,satara

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button