पुण्यात भाईगिरी वरून मित्रांमध्ये वाद! मित्राला दगडाने मारहाण
![Stone pelting between friends from Bhaigiri in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Swargate-Police-Station-780x470.jpg)
पुणे | पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाईगिरीवरून पुणे पोलीसांची कानउघड केली. अंगावर एखादा झंकीफंकी टी शर्ट, फाटलेली पँट, खिशात रुमाल, तोंडावर मास्क आणि हातात कोयता अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यातच आता भाईगिरीवरून होणारे वाद समोर येत आहेत. असाच प्रकार स्वारगेट परिसरातून समोर आला आहे.
दोन मित्र गप्पा मारत असताना एकाने मी खुप मोठा भाई आहे अशा भाईगिरीच्या बाता करत असताना दुसऱ्याने तु मोठा बाई झालास का? म्हणत राग अनावर झाल्याने मित्राच्याच कानाचा लचका तोडून डोक्यात दगड मारल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा – २६ जानेवारीला प्रभावी भाषण करायचं असल्यास या टिप्स फॉलो करा!
याप्रकरणी हर्ष कैलास कांबळे वय २० (रा. कैकाडी मित्रमंडळ समोर, मिनाताई ठाकरे वसाहत, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सौरभ नितीन आदमाने वय २४ (रा. भैराबा मंदीर शेजारी, चवाडी बावधान, पुणे) आणि पवन काळे या दोघांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ जानेवारी रोजी ९ ते १० या वेळत घडला.