भीमाशंकरला जाताना एसटी बसला अपघात, 35 प्रवासी, बस २० फूट खोल कोसळली, सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरुप…
![Bhimashankar, ST bus, accident, 35 passengers, bus 20 feet deep, collapsed, luckily, all passengers safe,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/bus-accident-1-780x470.png)
आंबेगाव : कल्याण येथून भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे असणाऱ्या ओढायावरून बस थेट वीस फूट खोल खाली कोसळली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून बसमधून एकूण ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघातात घडला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कल्याण येथून भीमाशंकर येथे निघालेल्या बस चालकाचे नियंत्रण आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावाजवळ असणाऱ्या ओढ्यात सुटले. त्यामुळे बस वीस फूट खोल दरीत कोसळली. यात पाच जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी प्रवास करत होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले. तसेच पाच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या होत्या. जखमींना घोडेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेली सतर्कता यामुळे या जखमींना वेळेत उपचार मिळू शकले.