ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

एक्झर्बिया अबोड गणेश मंडळातर्फे आयोजित नृत्य, चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनील पवार यांचा स्तुत्य उपक्रम

वडगाव (मावळ) : जांभुळगाव येथील एक्झर्बिया अॅबोड रहिवाशी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान-थोरांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त गुणांना मोकळेपणाने प्रकट करता यावे, हा दृष्टीकोन समोर ठेवून नृत्य व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेस येथील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनील पवार, खजिनदार पंढरीनाथ हिंगे यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

एकाच वेळी अनेक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या उत्सवाचे आकर्षणाचे केंद्र ठरले ते म्हणजे ‘डान्स एक्झर्बिया डान्स’ ही नृत्य स्पर्धा. विविध प्रकारच्या गीतांनी बहरलेली या स्पर्धेने युवकांना मोठ्या उत्साहात थिरकायला लावले. या नृत्य स्पर्धेमध्ये जुन्या व नवीन हिंदी मराठी चित्रपटांच्या गीतावर स्पर्धकांबरोबर, प्रेक्षकही थिरकले. अनेक रंगतदार गीतांवर नृत्यकला सादर करण्यात आली. क्लासिकल, वेस्टन, रीमिक्स अशा विविध प्रकारच्या गीतांवर लहान व मोठ्या मुलांनी उत्साहात जल्लोष केला.

नृत्य स्पर्धा तिन गटांत पार पडली. यांमध्ये लहान गट, मोठा गट आणि समूह नृत्य अशा प्रकारांत या स्पर्धा घेतल्या गेल्या. लहान गटात आरोही पुरी या चिमुकलीने प्रथम क्रमांक पटकावला तर स्वरांजली पाखरे हिस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

मोठ्या गटात वेदिका दिसले हिस प्रथम क्रमांक तर अनन्या कुमारी हिस द्वितीय क्रमांक मिळाला. समूह नृत्यामध्ये रचना कुंभार आणि प्रतीक्षा प्रक्षाळे या विजेत्या ठरल्या. प्रकाश कांबळे, प्रसन्न शिरोडकर, पंढरीनाथ हिंगे, सुनील आढाव यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पार पडला.

चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांची नावे
खुला गट सपना शर्मा हिस प्रथम, रब्बी कुमार शर्मा यास द्वितीय तर स्वरा सकट हीस तृतिय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन व उपस्थितांचे आभार मंडळाचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ पवार यांनी मानले.

जाणकार तरुणींनी केले परिक्षण
या स्पर्धेस अपूर्वा तापकीर, करुणा मानकामे, नम्रता घाग या परीक्षक म्हणून लाभल्या. आपल्या ओघवत्या शैलीत भारदस्त आवाजात सार्थक कुंभार, रोशनी खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

तांत्रीक अडचण अन् स्पर्धेस विलंब…
नृत्य स्पर्धेसाठी साऊंड सिस्टम व्यवस्था तांत्रिक अडणींमुळे वारंवार विस्कळीत झाली. यामुळे स्पर्धकांमध्ये कमालीची नाराजी पहायला मिळाली. मात्र मंडळावर नामुष्की ओढवली जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी सतर्कता दर्शवून ही स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र साऊंड सिस्टम अनेकदा मध्येमध्ये बंद पडत असल्याने स्पर्धकांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. तर अशा स्पर्धा जेव्हा जेव्हा आयोजित कराल, तेव्हा सर्व यंत्रणा नीट तपासूनच हाताळाव्यात, असाही सूर प्रेक्षकांमधून उमटला. या पुढील कार्यक्रमात याची आम्ही काळजी घेऊ, असे मंडळाचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button