breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

धक्कादायक..! प्रेम प्रकरणातून पिंपरी चिंचवडमधील वकिलाची हत्या

महिलेच्या पतीने हातपाय बांधून ड्रममधून नेले तेलंगणाला

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं, पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. संबधित महिलेच्या पतीनेच वकिलाचे अपहरण करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
शिवशंकर शिंदे यांचे त्यांच्या नात्यातील महिलेशी संबंध होते. वकील शिवशंकर शिंदेंचं लग्न झालेलं आहे, असं असताना ही त्यांचं नात्यातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. एवढेच नाही तर त्या महिलेचे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. मात्र असे असतानाही वकील आणि त्या महीलेने आपल्या नात्यात दुरावा आणला नाही.
मात्र कालांतराने ती महिला आपल्या पतीपासून वेगळी राहू लागली. त्यावर वकील असलेल्या शिवशंकर शिंदे यांनी त्या महिलेच्या पतीला घटस्फोट घे नाही तर आत्महत्या कर अशी धमकी वारंवार देत होता. या गोष्टीचा राग त्या संबंधित महिलेच्या पतीच्या मनात होता. त्यावरून त्याने वकिलाचा काटा काढण्याचे ठरवले.
त्यानुसार त्यांनी वकिलाचे 31 डिसेंबरच्या दुपारी वकिलाच्या कार्यालयातून अपहरण केले. त्यांचे हात-पाय अन तोंड बांधून एका ड्रम मध्ये बसवले. मग हा ड्रम एका टेम्पोत टाकून नांदेड जिल्ह्याच्या टोकाला आणले अन तिथंच अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मात्र हत्या कधी झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून त्याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button