‘मतदानादिवशी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना टपाली मतदान सुविधा द्या’; शीतल करदेकर
मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे निवडणूक आयोगाला निवेदन
![Sheetal Kardekar said that postal voting facility should be provided to journalists reporting on polling day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sheetal-Kardekar-780x470.jpg)
मुंबई | मतदानादिवशी वृत्तांकन करणाऱ्या देशभरातील प्रसार माध्यमातील छायाचित्रपत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्टचे प्रतिनिधी,व्हिडिओ जर्नालिस्टस यांना टपाली मतदानाची सुविधा द्यावी, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे.
याबाबत राजीव कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी, भारत यांना, एस चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे द्वारा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे वतीने निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा – मोहोळांसाठी भाजपचे “घर चलो अभियान”; १२ लाख नागरिकांपर्यंत पोहोचणार
मतदानादिवशी बहुतांशी पत्रकार विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्ट माध्यम प्रतिनिधी मतदान वृत्तांकनासाठी, नेत्यांंच्या मतदान कव्हरेजसाठी जातात. अशांचे मतदान राहून जाते. आणि म्हणूनच आमची विनंती अशी की, शासकीय कर्मचारी व वयस्क मतदारांप्रमाणे अशा पत्रकारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने लागू केली तर, ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत. (उदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कॕमेरामन प्रतिनिधी सिंधुदुर्गमध्ये कव्हरेजला गेल्यास इथे मतदान चुकू शकते.) आमच्या विनंतीचा व मतदानाच्या हक्काचा विचार करून अचुक निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.