शरद पवारांनी मानले ठाकरे बंधू आणि लता मंगेशकर यांचे आभार
![The Center should first pay GST to the state on time, said Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/shard-pawar.png)
मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँण्डोस्कोपी करून शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकांनी ट्विट करत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे.
शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान, प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच ट्वीट केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!,” असं पवारांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!,” अशा शब्दात पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार! @RajThackeray
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
लता मंगेशकरांचे आभार
“माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे,” असंही पवार यांनी म्हटलं आहे.
माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.@mangeshkarlata
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021