बीडमध्ये २ सख्ख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ
![Sensation after bodies of 2 sisters were found in a well in Beed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220205-.jpg)
बीड | प्रतिनिधी
मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या २ सख्ख्या बहिणींचे विहिरीत मृतदेह आढळल्यामुळे बीडमध्ये खळबळ माजली आहे. सानिया अल्ताफ शेख (१८) आणि निदा अल्ताफ शेख (१६) अशी त्यांची नावे आहेत. यातील सानिया मुकुंदराज महाविद्यालयात बारावीत शिकत होती. त्यामुळे ही हत्या की, आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीडच्या फ्लावर्स काँटर भागात राहणारे अल्ताफ शेख यांनी आपल्या दोन मुली सानिया आणि नीता यांना त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे सकाळी मोरेवाडीतील यशवंतराव चव्हाण चौकात सोडले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वाराती रुग्णालय रोडवरील कंपनीबाग परिसरातील गेटच्या विहिरीत त्यांचे मृतदेह सापडले. विहिरीच्या कठड्यावर ठेवलेल्या बॅगा बराचवेळ तेथेच असल्यामुळे शेळ्या चालणाऱ्या मुलाने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या मुलींची हत्या झाली की, त्यांनी आत्महत्या केली असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.