SC ST Helpline : अनुसूचित जाती /जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू
![SC ST Helpline: National Helpline against atrocities against Scheduled Castes / Scheduled Tribes started](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/QT-helpline-number-e1639375807843.jpg)
पुणे | अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींवरील (एसटी) अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन आजपासून (दि.13) सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) (PoA) कायदा, 1989 योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या वतीने ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
संपूर्ण देशात 14566 हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे, चोवीस तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून, ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असेल. त्याचे मोबाईल ॲप्लिकेशनही उपलब्ध असेल. तुमच्या प्रश्नांना IVR किंवा ऑपरेटरद्वारे हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये उत्तरे दिली जातील.
भेदभाव नष्ट करून सर्वांना संरक्षण प्रदान करणे हा उद्देश असलेल्या कायद्यातील तरतुदींबद्दल माहितीपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा या हेल्पलाइनचा हेतू आहे. हि सेवा वेब आधारित स्वयं-सेवा (self help) पोर्टल म्हणून देखील उपलब्ध असेल. NHAA नागरी हक्क संरक्षण (PCR) कायदा, 1955 आणि त्याच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करेल.
पीओए कायदा, 1989 आणि पीसीआर कायदा, 1955 चे पालन न केल्याबद्दल पीडित/तक्रारदार/एनजीओकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीसाठी एक डॉकेट क्रमांक दिला जाईल. तक्रारदार/एनजीओ यांना दाखल तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन जाणून घेता येईल.