breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

संभाजी भिडे पुन्हा बरळले, महात्मा फुले आणि साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. भिडेंच्या वादग्रस्त विधानानंतर अटकेची मागणी केली जात आहे. भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले आणि साई बाबा यांच्या विषयी वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

संभाजी भिडे म्हणाले की, इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकवण्यासाठी देशात सुधारक नावाची जात निर्माण केली. निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशताली भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूतील रामास्वामी नायकर आणि महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा सामवेश होता. या सगळ्यांच्या ढुंXX देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. यावर मी दोन तास भाषण करून मोठे खुलासे करू शकतो.

हेही वाचा – धक्कादायक! जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून गोळीबार, ४ जणांचा मृत्यू

आपला हिंदू समाज ज्या साईबाबाला पुजतो, त्या साईबाबाची लायकी काय ते तपासा. सर्वप्रथम त्या साईबाबाला घरातील देव्हाऱ्यातून बाहेर फेका. लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मी काही डोके सटकलेला माणूस नाही, मी हे सर्व जबाबदारीने बोलतोय, हे लक्षात घेऊन त्याला हिंदूचा देव मानू नका, असंही संभाजी भिडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button