रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात रूपाली चाकणकर यांचा कारवाईचा इशारा
![Rupali Chakankar warns of action against Rupali Thombre](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/rupali-chakankar-780x470.jpg)
सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई करू : रूपाली चाकणकर
पुणे :
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी खा. राहुल शेवाळे यांच्यावरून पीडित मुलीला न्याय देण्यासाठी सोशल मीडियावर लाईव्ह करत माहिती दिली होती. यावरून राजकारण तापले असून या संदर्भात अनेक सामाजिक संघटनांनी महिला आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.
या महिलेने आरोप केल्याने खासदार राहुल शेवाळे अडचणीत आले, पण आता रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीच कारवाईचा इशारा दिला आहे. पीडितेचे नाव घेणे किंवा तिला कॅमेऱ्यासमोर आणणे चुकीचे असल्याचे मत रूपाली चाकणकर यांनी नोंदवले आहे.
एखाद्या पीडितेची ओळख मिडियासमोर आणणे चुकीचे आहे. सामाजिक संस्थांच्या तक्रारीवरून महिला आयोग कारवाई करणार असल्याचंही चाकणकर म्हणाल्या आहेत. तसेच राहुल शेवाळे प्रकरणी पोलिसांवर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव आहे. या प्रकरणी महिला आयोगाने पोलिसांना आतापर्यंत 6 पत्र लिहिली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
सोबतच, २८ एप्रिल २०२१ ला मी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. माझा जबाब नोंदवला गेला. परंतु आतापर्यंत FIR झालेली नाही. खासदार असल्याने राजकीय दबाव पोलिसांवर टाकला जातोय. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. आम्ही २ वर्ष एकत्र होतो. स्वत:च्या कुटुंबाचा विश्वासघात करून राहुल शेवाळेने मला फसवलं. धमकावून माझं वारंवार शोषण केलं, असा आरोप फेसबुक लाईव्ह मधुन पीडितेने केला आहे.